ज्ञानेश्वरी
विभाग एकविसावा : सांचिन - ज्ञेयवाद ज्ञानेश्वरी- मराठी भाषेंतील 'काव्यारावो' म्हणून प्रसिद्ध असलेला हा ग्रंथ ग्रंथकर्ते श्रीज्ञानदेव यांनीं आपल्या वयाच्या पंधराव्या वर्षी लिहिला (ज्ञानकोश भाग २० यामध्यें वारकरी पंथ या माझ्या लेखांत 'एकोणिसाव्या ' वर्षी असें चुकून पडलें आहे). ग्रं था च्या र च ने चें स्थ ळ, का ळ व ग्रं थ क र्त्यां चें नां व.- आपल्याकडील जुन्या ग्रंथांचे काल निश्चित करणें हें काम किती कठिण आहे हें त्या बाबतींत प्रयत्न करणाऱ्या मंडळीस पूर्ण परिचयाचें आहे. पुष्कळ वेळां तर ग्रंथकर्त्यांच्या नांवाबद्दलहि निश्चितता होत नाहीं. या ग्रंथांच्या बाबतींत मात्र एक गोष्ट आनंद मानण्याजोगीं आहे. ती ही कीं, ग्रंथकर्त्यानें ग्रंथाचें स्थळ व ग्रंथकर्त्याचें नांव या बाबतींत ग्रंथाच्या सरतेशेवटी स्वत:च स्पष्ट खुलासा केला आहे. त्याचप्रमाणें ग्रंथाच्या कालासंबंधीहि अडचण पडण्याचें कारण नाहीं. कारण याच ग्रंथांच्या सरतेशेवटी एक ओवीं आहे. त्यामध्ये हा ग्रंथ शके १२१२ त...