Posts

Showing posts from August, 2020

ज्ञानेश्वरी

विभाग एकविसावा : सांचिन - ज्ञेयवाद                      ज्ञानेश्वरी-  मराठी भाषेंतील 'काव्यारावो' म्हणून प्रसिद्ध असलेला हा ग्रंथ ग्रंथकर्ते श्रीज्ञानदेव यांनीं आपल्या वयाच्या पंधराव्या वर्षी लिहिला (ज्ञानकोश भाग २० यामध्यें वारकरी पंथ या माझ्या लेखांत 'एकोणिसाव्या ' वर्षी असें चुकून पडलें आहे). ग्रं था च्या र च ने चें स्थ ळ, का ळ व ग्रं थ क र्त्यां चें  नां व.- आपल्याकडील जुन्या ग्रंथांचे काल निश्चित करणें हें काम किती कठिण आहे हें त्या बाबतींत प्रयत्न करणाऱ्या मंडळीस पूर्ण परिचयाचें आहे. पुष्कळ वेळां तर ग्रंथकर्त्यांच्या नांवाबद्दलहि निश्चितता होत नाहीं. या ग्रंथांच्या बाबतींत मात्र एक गोष्ट आनंद मानण्याजोगीं आहे. ती ही कीं, ग्रंथकर्त्यानें ग्रंथाचें स्थळ व ग्रंथकर्त्याचें नांव या बाबतींत ग्रंथाच्या सरतेशेवटी स्वत:च स्पष्ट खुलासा केला आहे. त्याचप्रमाणें ग्रंथाच्या कालासंबंधीहि अडचण पडण्याचें कारण नाहीं. कारण याच ग्रंथांच्या सरतेशेवटी एक  ओवीं आहे. त्यामध्ये हा ग्रंथ शके १२१२ त...

वाङ्‌मयेतिहास

विभाग बाविसावा : सूची खंड वाङ्‌मयेतिहास अमेरिकन-   ऍबट लीमन, इंगरसाल, इमर्सन, ट्वेन, थोरो, लांगफेलो. अरबी-   अबुल आला, अबुलफराझ, अबुलफिदा, अल्बीरुणी, इद्रिसी, अंतर इब्न शद्दाद, कुराण, खन्सा, खलील, खुर्दादभाई, जौहरी. आंग्ल-   अरबुथनाट, आयर्व्हिंग, आयर्व्हिन विल्यम, ऑस्टिन जेन, इंग्रजी वाङ्‌मय, इलियट, इलियड, ओव्हिड, ओस्कार, औस्ले, काँग्रीव्ह, कॉरेली, कार्लाइल, कीट्स, कोलेरीज, कौपर, गोल्डस्मिथ, ग्रीन, ग्रे, ग्रोट, चॉसर, टेलर, डिकन्स, डिक्केन्सी, डीफो, ड्रायडन थॅकरे, नार्थक्लिफ, पोप, बर्क, बर्न्स, बायरन, बेन, बेकन, ब्राउनिंग मिल्टन, मूर, मेकाले, मेरिडिथ, मोर्ले, रॅले, लिटन, वालपोल होरेशिओ, विल्यम्स मोनियर, विल्सन होरेस, शेक्सपिअर, शेले, हॅझलिट, हथॉर्न, हाब्ज, ह्यूम. आंग्लो इंडियन-  आंग्लो इंडियन वाङ्‌मय. इटालियन-  आरिओस्टो, इटालियन वाङ्‌मय, टॅसिटस, टॉसो, डांटे. इराणी-  (प्राचीन)-झरथुष्ट्र, झेंदावेस्ता. उर्दू-  खुशतर, खुश्रूअमीर. कानडी-  कानडी वाङ्‌मय, चन्न बसव, बसव (पुराण). गॉथिक-  गॉथिक वाङ्‌मय. गुजराती-  अलखबुलाखी, आखो भगत, गुजराती वा...